नवा विचार रुजविणारा आणि कार्यकर्त्यांमधून नेता घडविणारा किमयागार…’राज ठाकरे’

Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस. त्यांनी यंदाचा वाढदिवस कुटुंबासोबत घरीच राहून अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच पार्श्वभूमीवर राज यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहीले आहे.“मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या, याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत” असे आवाहन राज यांनी पत्रातून मनसे कार्यकर्त्यांना केले आहे.

कोरोनाच्या संकटात मनसे कार्यकर्ते जीवावर उदार होऊन मैदानात उतरून काम करत आहेत. त्याचा मला अभिमान आहे. मी भाग्यावान आहे मला तुमच्यासारखे सहकारी मिळालेत. कार्कर्त्यांना जिथे आहात तिथेच थांबा, माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छा देण्यास न येता आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असे आवाहन राज यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला आहे. नवा विचार रुजविणारा आणि कार्यकर्त्यांमधून नेता घडविणारा किमयागार… मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांना सर्व महाराष्ट्र सैनिकांतर्फे वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आपल्या साहेबांचा वाढदिवस, असे म्हणत पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांतर्फे राज ठाकरे याना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER