घोड्यावर नागिन डांस करीत अक्षयने केली धम्माल

Akshay

अक्षयकुमार (Akshay Kumar) बॉलिवुडमधील सगळ्यात यशस्वी आणि कोट्यावधी रुपये कमवणारा नायक आहे. कोरोना काळातही अक्षयने 300 कोटींच्या वर कमाई केल्याने तो फोर्ब्सच्या यादीतही आला होता. गेल्या वर्षी अक्षयकुमारचा स्पर्मच्या अदलाबदलीच्या कथेवर आधारित ‘गुड न्यूज’ सिनेमा (Good News Cinema) आला होता. त्यात अक्षय एका वेगळ्याच रुपात दिसला होता. गुड न्यूजला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद त्याने अत्यंत वेगळ्या पद्धतीने साजरा केला. एवढेच नव्हे तर त्या आनंदाचा व्हीडियो काढून त्याने करीना कपूर आणि दलजीत दोसांजबरोबर सोशल मीडियावर शेयरही केला.

ही बातमी पण वाचा:- आमिर खान लग्नाचा वाढदिवस गुजरातच्या जुनागढमध्ये साजरा करणार

अक्षयकुमारने शेयर केलेल्या व्हीडियोत तो एका घोड्यावर बसलेला असून घोड्यावरच तो नागिन डांस करताना दिसत आहे. व्हीडियोत एका लग्नाची वरात दिसत असून घोड्यावर वरही दिसलेला आहे. सोबत वरातीही दिसत आहेत. अक्षयकुमार वराच्या पुढे बसलेला दिसत असून तो नागिन गाण्यावर डांस करताना दिसत आहे. विशेष म्हणजे एक कॅमेरामन त्याचा डांस शूट करताना दिसत आहे. या व्हीडियोसोबत अक्षयकुमारने लिहिले आहे, ’या वर्षाचे जर वर्णन करायचे झाले तर ते असेच करावे लागेल. या वर्षात खूप चढ-उतार आले आणि प्रत्येक वेळी वेगळे रूप दिसले. परंतु आपण सर्व स्वतःला सावरण्यात यशस्वी ठरलो. मला आशा आहे की, आगामी वर्ष सगळ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर गुड न्यूज घेऊन येईल. असेही अक्षयने या व्हिडियोसोबत म्हटले आहे.

अक्षयकुमार सध्या आनंद एल रॉयच्या ‘अतरंगी रे’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमात अक्षयसोबत रजनीकांतचा जावई धनुष आणि सारा अली खान दिसणार आहे. अक्षयने नुकतेच ‘बेल बॉटम’ सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय त्याच्याकडे आता सात-आठ नवे सिनेमे आहेत. पुढील वर्षी अक्षयचे पाच ते सहा सिनेमे प्रदर्शित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER