अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ओटीटीवर होणार प्रदर्शित

laxmi

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘लक्ष्मी’ हा चित्रपट सोमवारी ओटीटी प्लॉट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. यावेळी अक्षयने या चित्रपटाचे पोस्टर चाहत्यांसह शेअर केले आहे. तसेच कॅप्शन लिहिले. पोस्टरमध्ये अक्षय कुमार हातात त्रिशूल, कपाळावर लाल ठिपका आणि लाल साडी परिधान केलेला दिसत आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारने थर्ड जेंडरची भूमिका साकारली आहे.

पोस्ट शेअर करताना अक्षय कुमार लिहितो, “तुमच्या घरात बरेच मनोरंजन, भयपट (Horror) आणि हशा (Laughter) येत आहेत. म्हणून दार उघडा आणि लक्ष्मीचे स्वागत करा, आज संध्याकाळी ७:०५ वाजता डिस्ने प्लस हॉटस्टार वर. “

हे माहितच आहे की, कोरोनाव्हायरसमुळे बरेच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. अशा स्थितीत अक्षय कुमार, कियारा अडवाणीचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्स यांनी केले आहे. तसेच निर्मिती, केप ऑफ गुड फिल्म्स, शबीना एंटरटेनमेंट आणि तुषार एंटरटेनमेंट हाऊसने केले आहे.

‘लक्ष्मी’ हा चित्रपट कुठे आणि केव्हा पाहायचा

  • वेळ – संध्याकाळी ७: ०५
  • तारीख – ९ नोव्हेंबर
  • कुठे- डिस्ने प्लस हॉटस्टार
  • स्टारर- अक्षय कुमार, कियारा अडवाणी
  • दिग्दर्शक- राघव लॉरेन्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER