एका चित्रपटासाठी अक्षयकुमार घेणार १०० कोटी रुपये !

Ram Setu - Akshay Kumar

अक्षयकुमारच्या (Akshay Kumar) ‘लक्ष्मी’ चित्रपटाला प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी नाकारले असले आणि त्याच्या आगामी चित्रपटांवर टांगती तलवार असली तरी त्याची किंमत कमी झालेली नसल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयकुमारने एक नवीन चित्रपट साईन केला असून या चित्रपटाचे बजेट १५० कोटींच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या १५० कोटींपैकी १०० कोटी रुपये एकटा अक्षयकुमार घेणार असल्याचे म्हटले जात आहे. म्हणजे चित्रपटाच्या एकूण बजेटपैकी पाऊण रक्कम एकटा अक्षयच घेणार आहे. यासोबतच अक्षयने शनिवारी ‘रामसेतू’ या चित्रपटाचीही घोषणा केली आहे. अक्षय स्वतः या चित्रपटाची निर्मिती करणार असून क्रिएटिव्ह निर्माता चंद्रप्रकाश द्विवेदी आहेत. अभिषेक शर्मा दिग्दर्शन करणार आहे.

रावणाने सीतेला पळवून श्रीलंकेला नेले होते. तेव्हा श्रीलंकेत जाण्यासाठी समुद्रात रस्ता तयार करण्यात आला होता. वानरसेनेने मोठे मोठे दगड टाकून हा रस्ता तयार केला होता. त्यावरून प्रभू श्रीराम श्रीलंकेत गेले आणि त्यांनी रावणाचा वध करून सीतेला परत आणले होते. अंतराळातूनही रामसेतू दिसतो असे सांगितले जाते. हा रामसेतू खरेच होता की निव्वळ कल्पना यावर आधारित अक्षयचा हा नवा चित्रपट आहे.

कोरोनाकाळानंतर शूटिंग पुन्हा सुरू झाल्यानंतर अक्षयकुमारने जॅकी भगनानी निर्मित ‘बेल बॉटम’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेसच जॅकी भगनानीने अक्षयसोबत आणखी एका चित्रपटाबाबत बोलणे सुरू केले होते. अक्षयने ‘बेल बॉटम’ टीमबरोबर आणखी एक चित्रपट करण्यास मान्यता दिल्याचे सांगितले जात आहे. हा विनोदी चित्रपट असून याचे दिग्दर्शन मुदस्सर अली करणार आहे. जॅकी भगनानी आणि त्याचे पिता वासु भगनानी या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे एकूण बजेट १५० कोटींच्या आसपास असणार आहे. मात्र एकटा अक्षयकुमारच १०० कोटी रुपये घेणार आहे.

विशेष म्हणजे हा एक क्विकी चित्रपट असून केवळ ४५ दिवसांत याचे शूटिंग पूर्ण केले जाणार आहे. याचा अर्थ अक्षयकुमारला प्रत्येक दिवसासाठी जवळ जवळ दोन कोटी रुपये मिळणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER