अक्षयकुमारने फोर्ब्सच्या टॉप-१०० हाय पेड सेलिब्रिटींच्या यादीमध्ये मिळवले स्थान

Akshay Kumar

अभिनेता अक्षयकुमार (Akshay Kumar) हा बॉलिवूडचा सर्वांत यशस्वी स्टार आहे. कित्येक वर्षांपासून अक्षयकुमारने प्रसिद्ध कलाकारांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे, ते त्याने कायम ठेवले आहे. यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे त्याचे एकामागून एक हिट चित्रपट देणे. अक्षयकुमार वर्षाला जवळपास चार चित्रपट प्रदर्शित करतो जे सुपरहिट राहतात. बॉक्स ऑफिसवर पैसे मिळतात.

सन २०२० हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत वाईट असल्याचे सिद्ध झाले. इतकेच नव्हे तर कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे प्रत्येक उद्योग लॉक झाला आहे. हे सर्व असूनही, अक्षयकुमारने लोकप्रियता मिळविली आणि स्वत:ला फोर्ब्सच्या टॉप-१०० हाय पेड सेलिब्रिटींच्या यादीत आपले नाव समाविष्ट केले.

ताज्या अहवालानुसार, अक्षयकुमार हा एकमेव भारतीय अभिनेता आहे ज्याचे फोर्ब्सच्या यादीत ५० व्या क्रमांकावर नाव आहे. फोर्ब्स मासिक दरवर्षी सर्वाधिक मानधन घेणार्‍या सेलिब्रिटींची यादी प्रसिद्ध करते.

सन २०२० मध्ये अक्षयकुमारची कमाई सुमारे ३५६ कोटी रुपये इतकी होती. अक्षयकुमारच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘बोल बच्चन’ आणि ‘बेल बॉटम’चा समावेश आहे. यानंतर अक्षयकुमार यशराज फिल्म्स अंतर्गत ‘पृथ्वीराज’मध्ये दिसणार आहे. नुकतेच अक्षयने ‘बेल बॉटम’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी पसरली होती की, निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी जाहीर केलेल्या ‘हाऊसफुल-५’ चित्रपटात अक्षयकुमारदेखील दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER