अबब. अक्षयकुमार एका सिनेमासाठी घेणार 135 कोटी रुपये!

akshay kumar

सलमान खान (Salman Khan) आणि अन्य नवीन नायकांना तोंड देत अक्षयकुमारने (Akshhay Kumar) बॉलिवुडमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. अक्षयचे सिनेमे म्हणजे बॉक्स ऑफिस यशाची गॅरंटी. त्यातच तो अत्यंत कमी वेळात सिनेमा पूर्ण करीत असल्याने सिनेमे रखडण्याची भिती निर्मात्याला कधीही वाटत नाही. त्याचा लक्ष्मी ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला आणि फ्लॉप झाला असला तरी त्याच्या लोकप्रियतेत आणि क्रेडिबिलिटीमध्ये फरक पडलेला नाही. त्यामुळेच अक्षयने आता प्रत्येक सिनेमासाठी 135 कोटी (Rs 135 crore)रुपये आकारण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा बॉलिवुडमध्ये आहे.

गेला काही वर्षात अक्षयकुमारचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले असून त्यांनी कोट्यावधींचा व्यवसायही केला आहे. कोरोनाकाळात फिल्म इंडस्ट्री बंद असली तरी अक्षयने मात्र 300 कोटींच्या वर कमाई केली आणि त्यामुळेच फोर्ब्ज मासिकाने श्रीमंत कलाकारांच्या जगभरातल्या यादीत अक्षयकुमारचा समावेश केला होता. अक्षय पूर्वी एका सिनेमासाठी 115 कोटी रुपये मानधन घेत असे. मात्र सिनेमा पाहून तो मानधनाची रक्कम कमी जास्त करीत असे. काही चित्रपटांच्या बाबतीत तर त्याने नफ्यात 25 ते 30 टक्के वाटाही मागितला होता आणि त्याला दिलाही होता. आपल्या सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर होणारा बिझनेस पाहून अक्षयने आता त्याच्या मानधनात वाढ करून ते 135 कोटी रुपये केल्याचे सांगितले जात आहे. 2021 मध्ये अक्षय जे नवे सिनेमे साईन करणार आहे त्यासाठी तो ही वाढीव मानधन घेणार आहे असे सांगितले जात आहे. अक्षयकडून मात्र या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER