अक्षयकुमारसारख्यांनी तरी मुंबईच्या अवमानाविरोधात बोलायला हवे होते- संजय राऊत

Sanjay Raut-Akshay Kumar

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रत्युत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त (POK) काश्मीरशी केली होती. या वक्तव्यानंतर चांगलाच वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून संजय राऊत यांनी कंगनासह बॉलिवूड इंडस्ट्रीवरही निशाणा साधला आहे.

कंगना रणौत या नटीने मुंबईबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याबद्दल किमान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीनं बोलायला हवं होतं. किमान अक्षयकुमारसारख्या (Akshay Kumar) मोठ्या कलावंतांनी समोर यायला हवे होते. मुंबईने त्यांनाही दिले आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवे होते. कंगनाचे मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचे मत नाही, असे सांगायला हवे होते, असे राऊत यांनी म्हटले आहे.

एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध एकेरी भाषेत बोलते. आव्हानाची भाषा करते आणि त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER