‘सूर्यवंशी’चे रिलीज पुढे ढकलल्याने ‘83’ चा झाला मार्ग मोकळा

akshay-kumar-s-sooryavanshi-postponed-to-2021-ranveer-singh-s-83-to-release-on-christmas

केंद्र सरकारने थिएटर पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने बॉलिवुडमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. 50 टक्केच उपस्थितीची परवानगी असल्याने अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांच्या सिनेमाचे रिलीज काही महिने पुढे ढकलले होते. अक्षयकुमार हा बॉलिवुडमधील यशस्वी कलाकार. त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर (Box office) कोट्यावधींचा धंदा करतात. त्याचे सिनेमे यशस्वी तर होतातच त्यातच तो कमी वेळात सिनेमे पूर्ण करीत असल्याने निर्माते त्याला साईन करण्यासाठी धडपडत असतात. मात्र कोरोना काळात अक्षयचा लक्ष्मी सिनेमा ओटीटीवर आला आणि तो सुपरफ्लॉप झाल्याने अक्षयच्या सिनेमावर त्याचा परिणाम दिसत आहे. रोहित शेट्टी (Rohit Shetty) द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित सूर्यवंशीकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. हा सिनेमा गेल्या वर्षी रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे रिलीज झाला नाही. आता या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये आकर्षण उरलेले नसल्याने सिनेमाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले आहे. ‘सूर्यवंशी’ होळीला रिलीज केला जाणार होता. परंतु याच दिवशी वॉर्नर ब्रदर्सचा भव्य असा ‘गॉडझिला व्हर्सेस कॉन्ग’ (Godzilla vs. Kong) सिनेमा रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे अक्षयच्या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नक्कीच परिणाम होईल हे जाणवल्याने आता हा सिनेमा बनवणाऱ्या रिलायंस एंटरटेनमेंटने सिनेमाचे रिलीज आणखी पुढे ढकलले आहे.

‘सूर्यवंशी’सोबतच अक्षयचे ‘बेल बॉटम’, ‘पृथ्वीराज’ आणि ‘अतरंगी रे’ सिनेमे जवळ जवळ तयार झाले आहेत. यापैकी बेल बॉटम ओटीटीवर रिलीज केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे त्याच्या अन्य सिनेमाचे निर्माते सिनेमा रिलीज करण्यास घाबरत आहेत. ‘सूर्यवंशी’चे रिलीज पुढे ढकलल्याने त्या जागेवर आता रणवीर सिंहचा गेल्या वर्षी रिलीज होणारा भारताने 1983 मध्ये वर्ल्ड कप जिंकलेल्या कथेवर आधारित 83 हा सिनेमा रिलीज करण्याची योजना आखण्यात आली आहे. 83 ची निर्मितीही रिलायंसनेच केली आहे. दीपिकाही या सिनेमाची सहनिर्मात्री आहे. सध्या क्रिकेटचा ज्वर असल्याने मार्चमध्ये 83 रिलीज करण्याची योजना तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER