अभिनेता अक्षयकुमार खऱ्या आयुष्यात बनला पॅडमॅन; लॉकडाऊनच्या काळात वाटतोय महिलांना सॅनिटरी नॅपकिन

Akshay Kumar

मुंबई :- देशात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. या दरम्यान अनेक गरजूंवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटकाळात समाजातील काही दानशूर व्यक्ती या लोकांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारही गरजूंच्या मदतीसाठी धावला आहे.

या संकटकाळात आतापर्यंत अक्षयने अनेकपरीने मदत केली आहे. आता तर तो खऱ्या आयुष्यात पॅडमॅन बनून महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करत आहे.

लॉकडाऊनमुळे सध्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे प्रचंड हाल होत आहेत. मासिक पाळीच्या दरम्यान गरीब महिलांना स्वच्छता राखता यावी यासाठी आता अक्षयकुमार सॅनिटरी नॅपकिन वाटत आहे. अक्षयने त्याच्या सोशल मीडियाद्वारे याविषयी माहिती दिली आहे. त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी एका चांगल्या गोष्टीला  पाठिंबा देत आहे. पण यासाठी तुमच्या पाठिंब्याचीदेखील गरज आहे. कोविडच्या या संकटात मासिक पाळीमुळे गरीब महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि त्यामुळे मुंबईतील गरीब महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करत आहोत. यासाठी सगळ्यांनी मिळून डोनेशनद्वारे मदत करावी… असे आवाहन अक्षयकुमार यांनी केले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER