या ५ चित्रपटांसह बॉक्स ऑफिसवर धमाल करण्याच्या तयारीत आहे अक्षय कुमार

यापूर्वी अक्षय कुमारच्या कोणत्याही चित्रपटाने निराश नाही केले

Akshay Kumar

अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या लंडनमध्ये ‘बेल बॉटम’ चित्रपटाची शुटिंग करत आहे. अक्षय कुमार उर्फ राजीव हरिओम भाटिया हा आज बॉलिवूडचा (Bollywood) सुपरस्टार आहे, पण इथपर्यंत पोहोचणे त्याच्यासाठी इतके सोपे नव्हते. यापूर्वी अक्षयच्या कोणत्याही चित्रपटाने निराश केले नाही अक्षयच्या चित्रपटांबद्दल बोलायचे तर दरवर्षी तो ४ ते ५ चित्रपटांसह त्याच्या चाहत्यांची मने जिंकतो. २०२० आणि २०२१ मध्ये अक्षय आपल्या आगामी चित्रपटांच्या माध्यमातून चाहत्यांची मने जिंकणार आहे, तसेच बॉक्स ऑफिसवरही हंगामा होणार आहे, कारण प्रेक्षक आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

लक्ष्मी बम
राघवा लॉरेन्स ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यापूर्वी हा चित्रपट ९ ऑक्टोबर २०२० रोजी ओटीटीवर रिलीज होणार होता, पण आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची चर्चा समोर आली आहे. अशा परिस्थितीत लवकरच या चित्रपट रिलीजची नवीन तारीख समोर येईल.

बेल बॉटम
या यादीत पुढील चित्रपट ‘बेल बॉटम’ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रणजित तिवारी यांनी केले असून हा चित्रपट २ एप्रिल २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये लारा दत्ता आणि हुमा कुरेशी देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

सूर्यवंशी
‘सूर्यवंशी’ मध्ये अक्षय पुन्हा एकदा कैटरीना कैफसह स्क्रीनवर धमाल करण्यास सज्ज झाला आहे. दोघांनी ‘हमको दीवाना कर गए’, ‘सिंह इज किंग’, ‘वेलकम’ यासारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले आहे. रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीस प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना साथीच्या आजारामुळे पुढे ढकलला गेला. आता हा चित्रपट १३ नोव्हेंबर २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.

बच्चन पांडे
‘बच्चन पांडे’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तहलका निर्माण करण्यास सज्ज आहे. तसेच हा चित्रपट फरहाद सम्‍जी दिग्दर्शित करीत असून हा चित्रपट पुढील वर्षी २२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कृती सेनन अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

पृथ्वीराज
या यादीत समाविष्ट असलेला ‘पृथ्वीराज’ हा चित्रपट चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित असून हा चित्रपटही यंदा २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत मिस वर्ल्ड असलेली मानुषी चिल्लर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER