अक्षयकुमारची नाशिक पोलिसांना मदत; ५०० अत्याधुनिक घड्याळांचे केले वाटप

Akshay Kumar - Nashik Police

नाशिक : अभिनेता अक्षयकुमारने मुंबई पोलिसांसोबत आता नाशिक पोलिसांनाही मदतीचा हात पुढे केला आहे. त्याने नाशिक पोलिसांना ५०० अत्याधुनिक हातातली घड्याळं दिली आहेत. हे घड्याळ पोलिसांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करणार आहे. अक्षयकुमारच्या या मदतीने पोलिसांनीदेखील त्याचे आभार मानले आहेत.

अभिनेता अक्षयकुमार याच्यासह दातार कॅन्सर जेनेटिक्स यांच्याकडूनही नाशिक पोलिसांना २७०० घड्याळांचे वाटप करण्यात आले आहे. हे घड्याळ दररोज शरीराचा रक्तदाब, तापमान, किती चाललो आणि किती कॅलरीज बर्न झाल्या याबाबत सविस्तर माहिती देते. विशेष म्हणजे हे अत्याधुनिक घड्याळ जर पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या हातात असेल तर दिवसभरात हे अधिकारी किती फिरले? त्यांनी कामं केलीत का? याचेही मोजमाप करण्यास मदत मिळेल.

गोकी या कंपनीने हे घड्याळ तयार केले आहे. हे घड्याळ आता पोलीस आयुक्तालयातील २२५ अधिकारी आणि तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. या घड्याळांचा चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळे नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अक्षयकुमार आणि दातार कॅन्सर जेनेटिक्स यांचे आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला