अक्षयकुमारने दिवाळीनिमित्त चाहत्यांना दिली खास भेट

Akshay Kumar - Ram Setu

बॉलिवूडचा (Bollywood) ज्येष्ठ अभिनेता अक्षयकुमार (Akshay Kumar) याच्याकडे आजकाल बरेच चित्रपट आहेत. तो लवकरच आपल्या बर्‍याच चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकणार आहे. आता दिवाळीनिमित्त (Diwali) त्याने आपल्या चाहत्यांना एक खास भेट दिली आहे. या दिवाळीत अक्षयकुमारने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या नव्या चित्रपटाविषयी सांगितले आहे.

अक्षयकुमारच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘रामसेतु’ आहे. या चित्रपटाशी निगडित आपले दोन लूक त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अक्षयकुमारने रामसेतु चित्रपटाशी संबंधित पोस्टर आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अक्षयकुमार लांब केसांसह दिसत आहे. काळ्या रंगाची बॅगही आहे. त्याच्या गळ्यात रुमाल गुंडाळलेला आहे.

या पोस्टरमध्ये भगवान रामाचे चित्र अक्षयकुमारच्या मागे दिसत आहे. हे पोस्टर शेअर करताना अक्षयकुमारने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘ही दिवाळी, भारत राष्ट्राच्या आदर्शांचे रक्षण करणारे आणि प्रभू श्री रामाच्या महान स्मृतींचे रक्षण करणारा पूल, येत्या युगानुयुगात भारताच्या चेतने मध्ये जपला जाईल आणि येणाऱ्या पिढ्या रामाशी जोडल्या जाईल. या प्रयत्नात आमचा एक छोटासा संकल्पही आहे- रामसेतु, आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.’

त्याच वेळी रामसेतु चित्रपटाशी संबंधित अक्षयकुमारने दुसरे पोस्टर आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. रामसेतुच्या पोस्टनुसार अभिषेक शर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. निर्माते अरुण भाटिया आणि विक्रम मल्होत्रा आहेत. रामसेतु चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अक्षयकुमारच्या चाहत्यांनाही त्याच्या चित्रपटाचे पोस्टर खूप आवडले आहे.

अक्षयकुमार सध्या ‘लक्ष्मी’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. मात्र, अक्षयकुमारचा हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकू शकला नाही. लक्ष्मी या चित्रपटामध्ये अक्षयसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER