अबब! अक्षयकुमारने सहा वर्षात कमवले 1744 कोटी रुपये

akshay kumar

बॉलिवुडमधील (Bollywood) सध्या सगळ्यात यशस्वी अभिनेता कोण असा प्रश्न विचारला की, 99 टक्के प्रेक्षक अक्षय कुमारचे (Akshay Kumar) नाव डोळे झाकून घेतील यात शंका नाही. कोरोना (Corona) काळातही अक्षयकुमारने अन्य कलाकारांच्या तुलनेत 300 कोटींच्या वर कमाई केली होती. त्यामुळेच फोर्ब्स मासिकाने गेल्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील कलाकारांच्या यादीत अक्षयचा समावेश केला होता. अक्षयने केवळ गेल्याच वर्षी नव्हे तर मागील काही वर्षात किती कमाई केली याची माहिती गोळा केली असता सलग सहा वर्षे अक्षयने कोट्यावधींची कमाई केली असून त्याच्या कमाईचा आकडा 1744 कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाकाळातही अन्य कलाकार कमाईपासून लांब असताना अक्षयने मात्र काम सुरु ठेवले होते आणि कमाईही सुरु ठेवली होती. त्याने गेल्या वर्षी सूर्यवंशी सिनेमा पूर्ण केला होता तसेच लक्ष्मी सिनेमाचेही शूटिंग पूर्ण केले होते. त्यानंतर कोरोना काळातही तो थंड बसला नव्हता. तो काही ना काही काम करीतच होता. शूटिंगची परवानगी मिळताच त्याने काही जाहिरातींचेही शूटिंग केले आणि परदेशात जाऊन बेल बॉटम सिनेमाचेही शूटिंग पूर्ण केले. गेल्या वर्षी अक्षयने तब्बल 356.57 कोटी रुपयांची कमाई केली होती.

अक्षयकुमार सिनेमाचे मानधन तर घेतोच, तो सिनेमाच्या व्यवसायात झालेल्या नफ्यातही बराच मोठा हिस्सा घेतो. त्याचे चित्रपट हिट होत असल्याने त्याच्या कमाईचा आकडा वाढताना दिसतो. 2019 मध्ये अक्षयने केसरी, मिशन मंगल, हाऊसफुल, आणि गुड न्यूज या सिनेमांसह काही कंपन्यांचा ब्रॅन्ड अॅम्बेसेडर होऊन त्यातूनही त्याने कमाई केली. ही कमाई 459.22 कोटी रुपये होती. 2018 मध्ये अक्षयकुमारने 277.06 कोटी रुपये तर 2017 मध्ये 231.06 कोटी, 2016 मध्ये 211.58 कोटी आणि 2015 मध्ये अक्षयने 208.42 कोटी रुपयांची कमाई केली होती.

एकूणच गेल्या सहा वर्षात अक्षयने एकूण 1744 कोटी रुपयांची कमाई केली आहे हे या आकडेवारीवरून दिसून येते. त्यामुळेच तो देशात सगळ्यात जास्त इनकम टॅक्स भरणारा कलाकारही ठरला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER