अक्षय कुमारने लष्कराच्या सैनिकांसह व्हॉलीबॉल खेळून आर्मी डे केला साजरा

akshay kumar

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) शुक्रवारी आर्मी डे (Army Day) साजरा केला. लष्कराच्या जवानांसमवेत थोडा वेळ घालवून हा खास दिवस त्याने साजरा केला. अक्षय कुमारने जवानांसह व्हॉलीबॉल देखील खेळला. त्याने यावेळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्याला खूपच पसंती मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार लष्कराच्या सैनिकांसह व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. यादरम्यान, तो ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला. अक्षय कुमारने हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मला लष्करी दिनानिमित्त मॅरेथॉन सुरू करण्यासाठी आज आपल्या देशातील काही शूर योद्ध्यांना भेटण्याची संधी मिळाली.” वॉलीबॉल खेळापेक्षा चांगले काय असू शकते?

सांगण्यात येते की सध्या अक्षय कुमार राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आपल्या बच्चन पांडे या नवीन चित्रपटाच्या शुटिंगसाठी आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो नचना हवेली येथे शूटिंग करताना दिसला. या चित्रपटात अक्षय कुमारसह कृती सैनन मुख्य भूमिकेत आहे. ती एका पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अक्षय कुमार एका गँगस्टरची भूमिका साकारत आहे. अक्षय आणि कृती व्यतिरिक्त अर्शद वारसी, प्रितीक बब्बर आणि पंकज त्रिपाठीची देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.

याशिवाय अक्षय कुमार जवळ अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्यात अतरंगी रे, रामसेतु आणि बेल बॉटम सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अक्षय कुमार अतरंगी रे चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. या चित्रपटामध्ये सारा अली खान मुख्य नायिकेच्या भूमिकेत असून दक्षिणचा सुपरस्टार धनुषही या चित्रपटाचा भाग आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल राय करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER