अयोध्येतील राम मंदिरासाठी खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन केले अक्षय कुमारने

Akshay Kumar appealed for Ram temple

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर निर्माण केले जाणार आहे. या मंदिरासाठी देशातील प्रत्येक घरातून देणगी गोळा केली जाणार आहे. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य घरोघर जाऊन ही देणगी गोळा करीत आहेत. प्रख्यात अभिनेता अक्षयकुमारनेही या मंदिरासाठी देणगी दिली असून प्रत्येक भारतीयाने मंदिर निर्माणात खारीचा वाटा उचलावा असे आवाहन एक व्हीडियो सोशल मीडियावर शेअर करून केले आहे. या व्हिडियोत त्याने रामसेतु बांधताना खारीने मदत केल्याचा किस्साही सांगितला आहे.

अक्षयने ट्विटर वर जवळ जवळ दोन मिनिटांचा एक व्हीडियो शेअर केला आहे. या व्हीडियोत अक्षयने, मंदिरासाठी देणगी गोळा करण्याच्या अभियानात जोडला गेलो असल्याचे म्हटले आहे. व्हीडियोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये अक्षयने म्हटले आहे, ‘अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर बनवण्यास सुरुवात झाली आहे याचा मला खूप आनंद होत आहे. आता आपण यात सहभागी होण्याची वेळ आली आहे. मी सुरुवात केली आहे. खात्री आहे की आपणही या अभियानात सामिल व्हाल. जय श्रीराम.’

अक्षयने तयार केलेल्या व्हीडियोत तो म्हणतो, काल रात्री मी माझ्या मुलांना एक गोष्ट सांगत होतो. तुम्ही सुद्धा ऐका, असे म्हणून त्याने श्रीलंकेत कैदेत ठेवलेल्या सीतामाईंना आणण्यासाठी हिंदुस्तान आणि श्रीलंका दरम्यान वानर सेनेने समुद्रात मोठे दगड टाकून राम सेतु कसा निर्माण केला ते सांगितले. तसेच या कामात खारीने कशी मदत केली याचेही वर्णन अक्षयने केले आहे. त्यानंतर अक्षयने, आता आपली वेळ असून आता आपल्यापैकी काही जणांनी वानर बनावे, खार बनावे आणि आपापल्या क्षमतेप्रमाणे या मंदिर निर्माणासाठी मदत करावी. जय श्री राम’ असे आवाहन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER