अक्षयकुमारलाही कोरोनाची लागण

akshay kumar

बॉलिवूडमधील(Bollywood) कलाकारांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडच्या ए ग्रेडच्या कलाकारांनाही कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. आता प्रख्यात अभिनेता अक्षयकुमारलाही कोरोनाची लागण (Akshay Kumar corona positive) झाली आहे. स्वतः अक्षयकुमारनेच सोशल मीडियावरून त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

अक्षयकुमारने सोशल मीडियावर याबाबत आज सकाळी एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये अक्षयकुमारने म्हटले आहे, आज सकाळी माझी कोरोना पोस्ट पॉझिटिव्ह आली आहे. कोरोना प्रतिबंधक सर्व काळजी घेऊन ताबडतोब मी आयसोलेटेड झालो आहे. मी सध्या होम क्वारंटाईन असून उपचार सुरु केलेले आहेत. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची स्वतःची कोरोना तपासणी करून घ्यावी. लवकरच कामावर परतेन.

अक्षयने काही दिवसांपूर्वीच त्याच्या रामसेतू सिनेमाचे शूटिंग सुरु केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button