अकोला : ४७.४ सोमवारचे तपमान राज्यात सर्वाधिक

Temperature

अकोला : काल २५ मे रोजी महाराष्ट्रात सर्वांत जास्त तपमान अकोला येथे ४७.४ होते. हे तपमान भारतात दुसऱ्या आणि जगात चौथ्या क्रमांकावर होते.

काल भारतात सर्वाधिक तपमान राजस्थानमधील चुरू येथे ४७.५ अंश होते. जगाच्या संदर्भात सर्वाधिक तपमान इराकमधील तुझ येथे ५०.५ आणि दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानमधील जाकोकाबाद ५० अंश होते.

२२ मे १९४७ ची विक्रमी नोंद ४७. ८

सोमवारचे ४७.४ अंश हे अकोल्याचे स्वातंत्र्यानंतरचे सर्वाधिक तपमान ठरले आहे. स्वातंत्र्याच्या आधी, २२ मे १९४७ रोजी अकोल्यात तपमानाची विक्रमी नोंद ४७.८ आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER