अकोल्यात कोरोनाचा कहर सुरूच, २२ नव्या रुग्णांची नोंद, तर ५ जणांचा मृत्यू

corona positive

अकोला : कोरोना या संसर्गजन्य आजाराने अकोल्यात प्रचंड धुमाकुळ घातला असून, या जीवघेण्या आजारामुळे बाधित होणाऱ्यांसह मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, १४ जून रोजी अकोला शहरातील चार तर बाळापूरातील एक अशा एकूण पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५१ वर पोहचला आहे. तर एकूण रुग्णसंख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ वर गेली आहे. कोरोनामुळे एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने जिल्हा हादरला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काल, शनिवारी ३४२७ रुग्णांची भर पडली आहे. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४ हजार ५६८ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाबमध्ये काल एकूण १५५० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर कालपर्यंत एकूण ४९ हजार३४६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल राज्यात एकूण ११३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

तर सध्या ५१ हजार ३७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल झालेल्या ११३ मृत्यूंपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत. मुंबईत आज ६९, ठाण्यात ३, पुण्यात १०, नवी मुंबई ८, कल्याण-डोंबिवलीत १, पनवेल, ६, सोलापूर ८, सातारा १, औरंगाबाद ३, लातूर २, नांदेड १, यवतमाळमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER