अकोला; कोरोनाच्या २ रुग्णांचा मृत्यू; १२ नवे

Akola Coronavirus

अकोला : अकोला जिल्ह्यात शनिवारी कोरोनाच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. दोन्ही रुग्ण महिला आहेत. दिवसभरात १२ नवे रुग्ण आढळले असून रुग्णाचा एकूण आकडा ९८५ झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या ४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या ४६ पैकी एका रुग्णाने आत्महत्त्या केली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये ३ महिला आणि ९ पुरुष आहेत.

शनिवारी १९ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. यात १२ महिला आणि ७ पुरुष आहेत. ७ रुग्णांना कोविड केंद्रात निरीक्षणात ठेवले आहे व १२ जणांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER