२ जानेवारीपर्यंत अक्कलकोट स्वामी मंदिर दर्शनासाठी बंद

Akkalkot Swami Mandir

सोलापूर :- अक्कलकोट स्वामी मंदिरात सलग सुट्यांमुळे गर्दी होत आहे. गर्दीमुळे कोरोना (Corona) संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून शुक्रवारपासून शनिवार, २ जानेवारीपर्यंत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्यात येणार अशी माहिती मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली. येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षी २५ डिसेंबर ते २ जानेवारीअखेर नाताळ सुट्या, दत्त जयंती व नूतन वर्षानिमित्त स्वामीभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यंदा नाताळ सणाची सुटी, रविवार तसेच सलग शासकीय सुट्या आहेत. मंगळवार, २९ रोजी श्री दत्त जयंती आहे. गुरुवार, ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व शुक्रवार, १ जानेवारी २०२१ रोजी नूतन वर्षाची सुरुवात होणार असल्याने भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER