अकबरुद्दीन ओवेसी यांचा औरंगाबाद दौरा रद्द

Akbaruddin Owaisi

औरंगाबाद : एमआयाएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी २९ फेब्रुवारीला शहरात येणार होते. परंतु त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. एमआयएमचे कार्याध्यक्ष डॉ. गफार कादरी यांनी हा दौरा रद्द झाल्याची माहिती दिली. पुढे कादरी म्हणाले, अकबरुद्दीन ओवेसी हे २९ फेब्रुवारी रोजी एका सीबीएससी शाळेच्या भूमिपूजनासाठी शहरात येणार होते. या निमित्ताने शहरात त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

परंतु प्रकृती बिघडल्याने दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात अकबरुद्दीन ओवेसी शहरात येतील आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असेही कादरी यांनी यावेळी सांगितले.