अखेर राष्ट्रवादीची सरशी, चंद्रकांतदादांच्या ठिकाणी अजितदादा काढणार घरकुलांची सोडत

Ajit Pawar-Chandrakant patil

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (pimpri-chinchwad Mahanagarpalika) पंतप्रधान आवास योजनेची सोडत चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या हस्ते 11 जानेवारीला काढण्यात येणाऱ होती. मात्र ऐनवेळी ती रद्द करण्यात आली होती. आता ही रद्द झालेली सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आणि केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्या काढण्यात येणार आहे. अजित पवारांच्या हस्ते ही सोडत काढण्याची मागणी करून त्यासाठी राष्ट्रवादी कॅाग्रेसने आंदोलन केले होते. त्यामुळे होणारी सोडत राजशिष्टाचाराला धरून नसल्याचे कारण देत महापालिकेने शेवटच्या क्षणी ती रद्द केली होती.

मागच्या महिन्यातील ही सोडत रद्द झाल्यामुळे पालिकेतील सत्ताधारी भाजपवर नामुष्की ओढावली होती. महापौर आणि सभागृहनेत्यांना आयुक्तांच्या कक्षाबाहेर ठिय्या आंदोलन करावे लागले होते. स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न बाळगलेल्या आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या या घरांच्या योजनेत अर्ज केलेल्या हजारो रहिवासीयांनी ही सोडत लवकर काढण्याची मागणी केली होती. त्यामुळे नमते घेत भाजपने आता ही सोडत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या हस्ते काढण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी ही सोडत आता विनाअडथळा पार पडेल.

शहरासाठी कुठलंही योगदान दिल नसलेल्या चंद्रकांतदादांच्या हस्ते सोडत न काढू देण्याचा इशारा राष्ट्रवादी कॅाग्रेसने दिला होता. तसेच या योजनेचे फक्त वीस टक्के काम झाले असल्याने निव्वळ श्रेय लाटण्यासाठी देखील सोडत काढण्यास विरोध केला होता. मात्र, त्यानंतर जेमतेम दीड महिन्यात या योजनेचे बहूतांश काम हे अजूनही मार्गी लागलेले नाही, तरीही सोडत काढली जात आहे. मात्र, यावेळी ती अजितदादांच्या हस्ते असल्याने राष्ट्रवादीचा विरोध आता मावळला आहे.

दरम्यान, शहरातील वाढत्या कोरोनामुळे पूर्वी ऑफलाईन होणारी ही सोडत आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे या योजनेत अर्ज केलेल्यांना प्रत्यक्ष सोडतीच्या ठिकाणी हजर राहता येणार नाही. त्यांना ऑनलाईन उपस्थित राहावे लागणार आहे. तसे आवाहन महापालिकेने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER