अजितदादा म्हणाले, ‘वारं बदललं ! भाजपचे १९ नगरसेवक राष्ट्रवादीत येणार?’

Ajit Pawar - NCP - BJP

पुणे :- पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) भाजपचे (BJP) १९ नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावरच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारले असता, त्यांनी खास शैलीत मोठे विधान केले आहे. आता महाराष्ट्रात वारं बदललेलं आहे, असे सूचक वक्तव्य अजितदादांनी केले .

गेल्या दोन आठवड्यांपासून पुण्यातील भाजप नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत . पुणे महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने पुण्यातील राजकीय वातावरणदेखील तापलं आहे. आज अजित पवार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग संदर्भात बैठकीसाठी पुण्यात आले असता पत्रकारांनी त्यांना याचसंदर्भात प्रश्न विचारले .

मागील काळात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा झंझावात पाहायला मिळाला. देशात भाजपची सत्ता आली. अनेक राज्यांत मोदींमुळे भाजप सत्तेत आला. परंतु आता महाराष्ट्रात वातावरण बदललेलं आहे. महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आल्याने राज्यातली राजकीय समीकरणे बदलली आहेत. जर कुणी आपल्या प्रभागाचा आणि वॉर्डाचा विकास व्हावा म्हणून जर त्यावेळी गेले असतील आणि आता जर वेगळा विचार करून परत येण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांचा स्वार्थ नाही; कारण फक्त ‘विकास’- अशी जोरदार राजकीय फटकेबाजी अजित पवार यांनी केली.

“वारं बदललं की काही जण बदलत असतात. राजकारणात काम करताना वेगवेगळे टप्पे येत असतात. अनेक जण अनेक वेळा वेगळे निर्णय घेत असतात… मागे आमच्या पक्षामधल्याच काही जणांनी भाजपमध्ये उड्या मारल्या. उड्या मारणाऱ्या नेत्यांना पक्षनिष्ठा वगैरे काहीही नसते, असा टोला त्यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : पालकमंत्र्यांचे छुपे गुण आणि अजितदादा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER