अजितदादा, … पवार साहेबांनी घरात नसत घेतल तर काय लायकी राहिली असती? निलेश राणेंचा टोमणा

Maharashtra Today

मुंबई :- पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतले नसते तर अजित पवार यांची काय लायकी राहिली असती, अशी जळजळीत टीका भाजपाचे निलेश राणे यांनी केली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी मराठा मोर्चा काढणाऱ्या नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्यावर केलेल्या टीकेच्या उत्तरात निलेश राणे (Nilesh Rane) यांनी अजित पवाराना टोमणा मारला.

निलेश राणे यांनी ट्विट केले – अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी (Maratha Samaj) काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचे धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतले नसते तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा.

नरेंद्र पाटलांवर अजित पवारांनी केली होती टीका –

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर टीका करताना अजित पवार म्हणाले होते – काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोक काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button