अजितदादा भडकले ! म्हणाले, मोठी ऍक्शन घ्यायला भाग पाडू नका !

Ajit Pawar

पुणे : प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी मला कामाचा हिशेब द्यावा लागेल. कामांमध्ये हयगय केली तर उचलून सरळ अडचणीच्या ठिकाणी बदली करेन! मला मोठी ऍक्शन घ्यावी लागेल- अशा सडेतोड शब्दांत पुण्याचे पालकमंत्री व  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पुण्यामध्ये कोरोनाची चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची गंभीर दखल घेत त्यांनी बैठक घेतली. बोलण्यामुळे आणि काम बेधडक करण्याच्या विशिष्ट ‘अजितदादा’ स्टाईलमुळे ते प्रसिद्ध आहेत.

आज याचेच प्रत्यंतर अधिकाऱ्यांना बैठकीत आले. पवार म्हणाले, कोरोना (Corona) आटोक्यात न आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. हे संबंधितांनी ध्यानात ठेवावे. कोरोना रोखण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत यासाठी राज्य सरकार आपल्या सदैव पाठीशी आहे. मात्र अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दिरंगाई होता कामा नये. मला कामाचा हिशेब द्यावा लागेल, या शब्दांमध्ये अधिकाऱ्यांना अजित पवार यांनी सुनावलं. त्यांना अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर न मिळाल्याने ते अधिकच चिडले. यापुढे जर कामात सुधारणा दिसली नाही तर मला मोठी ऍक्शन घ्यावी लागेल असा सज्जड दमही त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी भरला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER