पुण्याला कोरोनातून सावरण्यासाठी अजित, शरद पवार मैदानात

Ajit- Sharad Pawar in the field to save Pune from Corona
  • पुण्यात कोरोनाचा कहर पाहता शरद पवारांच्या मॅरोथॉन बैठका आणि अधिका-यांना कडक सुचना.
  • तर, उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारही जिल्ह्याला कोरोनातून सावरण्यासाठी फ्रंटवर.
  • पांडूरंगाच्या मृत्यूला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
  • एका पत्रकाराला कोरोनाने जीव गमवावा लागला हे अत्यंत दुःखद अजित पवारांनी दिले कडक कारवाईचे आदेश.

मुंबई :  पुण्यात नुकताच पत्रकार पांडूरंग रायकर यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने पुण्यातील आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) मैदानात उतरले. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील आरोग्यव्यवस्थाव कोरोनाच्या स्थितीबद्दल माहिती दिली. तसेच, पत्रकार पांडूरंग रायकर यांच्या मृत्युच्या चौकशीचे आदेश दिले असल्याचेही सांगितले. तसेच, पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.

आपल्यातील एका पत्रकाराला स्वत:चा जीव गमवावा लागला. ही अतिशय दु:खद घटना घडली. ती घटना घडल्यानंतर मी मीडियासमोर आलो नाही. मात्र, मी ताबडतोब विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. याबाबत चौकशी झाली पाहिजे. ससूनच्या टीमला त्याची जबाबदारी दिली आहे. त्याचा अहवाल सोमवारी येईल,” असे अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मृत्यूचे प्रमाण पाहता तेथील आरोग्यव्यवस्था व एकूणच परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता आता दोन्ही पवार मैदानात उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी आज बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील याबाबत चर्चा झाली. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER