माळेगावात अजित पवारांच्या समर्थकावर गोळीबार, तालुक्यात चर्चेला उधाण

Ajit Pawar supporters shot dead - Maharashtra Today

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कट्टर समर्थकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे (वय ४०) यांच्यावर आज सायंकाळी दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तावरे यांना तातडीने बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे माळेगावसह तालुक्यात खळबळ उडाली असून विविध चर्चेला उधाण आले आहे.

रविराज तावरे हे त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्यासोबत सायंकाळी संभाजीनगरला वडापाव खरेदी करण्यासाठी आले होते. यावेळी वडापाव घेऊन त्यांनी संबंधित दुकानदाराचे पैसे दिले. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्यादोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे धक्का बसला. यातूनही त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला होता.

जखमी अवस्थेतील तावरे यांना तातडीने बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. माळेगावातील राजकीय घडामोडींमध्ये रविराज यांची भूमिका निर्णायक ठरते. त्यामुळे आज त्यांच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत विविध चर्चा रंगू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button