अजित पवारांची आज आढावा बैठक; कडक लॉकडाऊनवर निर्णय होण्याची शक्यता

Ajit Pawar

पुणे : राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . पुण्यातही कोरोनाने थैमान घातले आहे . काही दिवस रुग्णसंख्या कमी होते आणि त्यानंतर अचानक वाढते. याच पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज सकाळी 11 वाजता आढावा बैठक घेणार आहेत.

पुण्याचे पालकमंत्री अजित पवार(Ajit bPawar) हे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज प्रशासनासोबत आढावा बैठक घेणार असून सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे कडक लॉकडाऊनवर निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात (possibility-of-decision-on-strict-lockdown) येत आहे.

आतापर्यंत झालेल्या आढावा बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे निर्णय घोषित केले होते. त्यानंतर आज होत असलेल्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे कडक लॉकडाऊन संदर्भात चर्चा होऊ शकते.

दरम्यान वार हे अधिकाऱ्याशी संवाद साधून या परिस्थितीचा आढावा घेऊन नेमका काय निर्णय घेणार? आणि पुण्यात कडक लॉकडाऊन लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button