‘आम्ही स्वप्नं पाहत नाही, आम्ही कृती करणारी माणसं’,अजित पवारांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

Ajit Pawar - Chandrakant Patil

कराड : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्रिपदावरुन टोचल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही फटकेबाजी केली आहे. ” चंद्रकांतदादा पाटील यांना कुणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडली. आम्ही स्वप्नं पाहण्याचं काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसं आहोत. १०५ आमदार असताना सरकार बनवता आलं नाही, हे भाजप नेत्याचं खरं दुखणं आहे, म्हणून भाजपचे नेते सारख्या काट्या पेटवतात..” अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

अजित पवार यावेळी म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकार काम करत आहे. प्रवेशाबाबत लवकरच जी आर काढला जाणार आहे, दोन दिवसात यावर निर्णय घेऊ असं ते म्हणाले.

शिवसेना (Shiv Sena) आमदार सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यावरील ईडीच्या (ED) कारवाईसंदर्भात ते म्हणाले की, ईडीच्या कारवाई दरम्यान केंद्र सरकार कशा पद्धतीने, कुठल्या फोर्सची मदत घेतात, त्यांचा निर्णय असतो, पवार साहेब यांनी या कारवाई बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. वीज बिलाच्या संदर्भात अभ्यास सुरू आहे. ५९ हजार कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे. गेल्या सरकारमुळे महावितरण (MSEDCL) अडचणीत आले आहे.कोरोनात राज्याची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. अजून नऊ महिने झालं तरी कोरोनावरची लस आली नाही. २९ हजार कोटी रुपये केंद्रकडून येणं बाकी आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून देखील नैसर्गिक संकटात केंद्र राज्याच्या पाठीशी उभा राहील नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER