शिवेंद्रसिंहराजे भेटीवर अजित पवारांचा खुलासा

Ajit Pawar-Shivendra Raje

पुणे : साताऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रराजे (Shivendra Raje) विकास कामासाठी आले होते. त्यामुळे असा काही अर्थ काढू नका. त्यात काहीही काळंबेरं  नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

साताऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी अजित पवारांची पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात भेट घेतली होती. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी याबाबत खुलासा केला .दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार १० ते  १७ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीप्रमाणे मुसळधार पावसाची शक्यता होती. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात हा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे.

त्याशिवाय पुढील दोन दिवस अशाच प्रकारे पाऊस पडू शकतो. मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर NDRF च्या बोटी किंवा मदतकार्य पोहचवणं हे काम सुरू  आहे. विभागीय कार्यालयात मी सकाळपासूनच आढावा घेत आहे. खासदार सुप्रिया सुळेंनीही पाहणी केली आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER