अजित पवारांचा राजकीय गौप्यस्फोट ! भाजपचे अनेक आमदार महाविकास आघाडीच्या वाटेवर

Ajit Pawar - BJP

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार आहे. हे सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. अवघ्या सहा महिन्यात हे सरकार पडेल, असा दावा विरोधकांनी केला होता.मात्र विरोधकांचा हा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी फेटाळून लावला . आता पाहा पुढील चार महिन्यात भाजपचे (BJP) अनेक आमदार महाविकास आघाडीच्या गोटात सामील होतील’, असा गौप्यस्फोट करून अजित पवार यांनी केला .

राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपला जनतेने सपशेल नाकारलं आहे. धुळे-नंदुबारमध्ये भाजपचे उमेदवार अमरिश पटेल हे विजयी ठरले. पटेल हे आमच्याकडून तिकडे गेले आहेत. ते आणि आम्ही समविचारी आहेत. त्यामुळे ते कधी घरवापसी करतील हे, भाजपला कळणारही नाही, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला. भाजपचा गड समजला जाणाऱ्या नागपूर आणि पुण्यात मात्र महाविकास आघाडीने मोठं खिंडार पाडले आहे. पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. ही बाब भाजपसाठी धोक्याची घंटा आहे, याबाबत भाजपने आत्मचिंतन करावे , असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना ड्रेस कोडबाबत सरकारने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. मात्र त्याबाबत सरकार फेरविचार करत आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER