कोरोना काळात अजित पवार यांचा नवा लूक, ‘हातात ग्लव्ह्ज, तोंडावर मास्क’; कार्यकर्ते मात्र अजूनही बिनधास्त

Ajit Pawar

पुणे :  गेले सात आठ महिन्यांपासून संपुर्ण देश कोरोनाच्या सावटाखाली जगत आहे. मंत्री, कार्यकर्ते ऑनलाईन झाले आहेत. मात्र, असे असले तरी फार काळ मंत्र्यांना ऑनलाईन राहून चालत नाही. लोकांमध्ये मिसळणे, अधिका-यांसोबत बैठका अशी सर्व कामे सुरूच ठेवावी लागतात. त्यातल्या त्यात राज्याच्या प्रमुख पदावर असलेल्या मंत्र्यांना रोजच्या बैठकांमधून सुटका नाही. अशात मंत्रीही कोरोनाची सर्व काळजी घेऊन आपली कामे करताना दिसत आहेत. राजकीय बैठका घेण्यास मनाई असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार असो वा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठका घेत आहेत. त्यातच शिस्तप्रिय अशी ओळख असेलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेल्या आठ महिन्यांपासून आपण तोंडावर मास्क आणि हातात ग्लव्ह्ज असाच त्यांचा नवा लूक पाहात आहोत.

कोरोनामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) सर्वाधिक काळजी घेणारे नेते आहेत. सार्वजनिक ठिकाणी तसेच फॅमिली कार्यक्रमातही अजित पवार कोरोनाची संपुर्ण काळजी घेऊनच ते वावरतात. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांनाच याचा विसर पडलेला दिसून आला आहे.

राजकीय बैठका घेण्यास मनाई असताना नियमाचे उल्लंघन करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. सुरक्षित अंतराचा फज्जा उडाला होता.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्या ८० हजाराच्या उंबरठ्यावर आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी राज्य सरकार खबरदारी घेत आहे. अनलॉक पाचमध्येही राजकीय बैठका घेण्यास परवानगी नाही.

एकीकडे कोरोना काळात उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वाधिक काळजी घेताना दिसत आहेत. मास्क, ग्लव्ह्ज सतत ते परिधान करतात. जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करतात. स्वतःच्या बैठकीत काळजी घेतात. अधिकाऱ्यांना सूचना देतात. पवार हे नियम पाळत असताना त्यांच्या पक्षाला, नगरसेवकांना मात्र, याचा विसर पडला आहे.

दरम्यान यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक झाली. जनतेच्या प्रश्नासाठी जनसेवकाची बैठक झाली. सामाजिक अंतर, मास्क आदी नियमांचे पालन करून चर्चा झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER