परिवहन क्षेत्रासाठी अजित पवारांची महत्त्वाची घोषणा!

Ajit Pawar

मुंबई :- अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात परिवहन क्षेत्रासाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात पुणे, नगर, नाशिक रेल्वेमार्ग, नागपूर मेट्रो नवीन प्रकल्प, ठाण्यातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, बसस्थानकांच्या आधुनिकीकरण आदी प्रकल्पांची घोषणा केली. परिवहन विभागाला २ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली.

पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वेमार्ग उभारणार आहेत. यासाठी १६ हजार १३९ कोटी मंजूर केले आहेत. नागपूर मेट्रो (Nagpur Metro) न्यू प्रकल्प हाती घेतला जाईल. ठाण्यात ७ हजार ५०० कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार आहे. अहमदनगर, बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम वेगाने केले जाईल, बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी १ हजार ४०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एलोरोच्या विमानतळाचा विस्तार केला जाईल, तसेच सोलापुरातल्या बोरामणी विमानतळाचे काम वेगाने करणार आणि पुण्याजवळ नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.

परिवहन क्षेत्राच्या महत्त्वाच्या घोषणा

  • पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वेमार्ग, १६,१३९ कोटी मंजूर
  • नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प
  • ठाण्यात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प
  • अहमदनगर,बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम
  • बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी १,४०० कोटी रुपये
  • परिवहन विभागाला २,५०० कोटी रुपये
  • एलोरोच्या विमानतळाचा विस्तार
  • सोलापुरातल्या बोरामणी विमानतळाचे काम
  • पुण्याजवळ नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ

ही बातमी पण वाचा : हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा की मुंबई महापालिकेचा ? फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER