आमच्यावर न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देऊ नका; अजित पवारांचा राज्यपालांना इशारा

Ajit Pawar & bhagat singh koshyari

नाशिक :- राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे अजूनही प्रलंबित असल्यामुळे वाद पेटण्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता राज्यपालांना थेट न्यायालयात जाण्याचाच इशारा दिला आहे. अजित पवार आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत निधी वाटप आणि विकासकामांबद्दल अजित पवार यांनी माहिती दिली. तसंच राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीवर जाहीर भाष्य केले. विधानसभेत बहुमत असणाऱ्या सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन नियमात बसणारे १२ लोक ठरवले आहेत. ती यादी ही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवली आहे. याला महिने उलटले पण अजूनही राज्यपालांनी याबद्दल कोणताही निर्णय घेतला नाही.

राज्यपाल लवकरच नावं जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. ते आम्हाला कोर्टात जाऊ देणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असं सूचक विधान अजित पवार यांनी केलं. तसंच, मुंबई लोकल सेवा सुरू झाली आहे. पण लोकलसाठी काही वेळा ठरवून दिल्या आहेत. या वेळांबद्दल प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्याचे कानी आले आहे. त्यामुळे मुंबई लोकलच्या वेळा आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन योग्य तो बदल केला जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

गुलाम नबी आझाद हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या निरोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे भावुक झाले होते. दोघांच्या जुन्या आठवणी आहे, त्यामुळे भावुक झाले. पण तोच भावुकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत असावा ही अपेक्षा होती, असा टोलाही अजित पवारांनी लगावला. राज्यात मतदान प्रक्रियाही मतप्रक्रियेनं व्हावी अशी सूचना माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली होती. पण, त्यांची अशी सूचना जरी असली तरी मतदान हे ईव्हीएमद्वारेच व्हावे. निदान पराभव झाला तर मशीनवर खापर फोडता येते, असा मिस्कील टोलाही अजित पवार यांनी लगावला. ‘राज्य सरकारकडून १ लाख ५० हजार कोटी वेतन आणि पेंशनवर खर्च झाला आहे. निधीचे योग्य प्रकारे वाटप सुरू आहे. ’ अशी माहिती अजित पवारांनी दिली.

अजित पवार यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल बोलताना केंद्र सरकारनं दोन पावलं मागं यावं, असं म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाले. तोच भावुकपणा शेतकऱ्यांच्या बाबतीत दाखवला तर बरं होईल, असं अजित पवार म्हणाले. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) कोणतेही वाद नाहीत. कोणताही निर्णय घेताना उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी एकत्र बसून घेतील, असंही अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER