अजितदादांचे अत्यंत विश्वासू आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार, थोडक्यात बचावले

Ajit Pawar - Maharashtra today

पुणे :- पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांच्यावर भरदिवसा गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घडली घटना आहे. ठेकेदारीच्या भांडणातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. सुदैवाने घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.

पिंपरी चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांचं कार्यालय आहे. याच परिसरात दुपारी १ वाजेच्या सुमारास तानाजी पवार नावाच्या इसमाने त्यांच्यावर हल्ला केला. तानाजी पवारने पिस्तुलीतून अण्णा बनसोडे यांच्यावर ३ राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे. या गोळीबारातून अण्णा बनसोडे हे थोडक्यात बचावले. पोलिसांनी धाव घेऊन तानाजी पवार याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक पिस्तुल सुद्धा जप्त केले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पिंपरी चिंचवड पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

महाराष्ट्राच्या जनतेने इतिहासातील ‘राजकीय भूकंप’ २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अनुभवला. राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी (Ajit Pawar) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट फुटल्याचं म्हटलं गेलं. यावेळी १२ आमदारांपैकी अगदी शेवटपर्यंत अजित पवारांसोबत राहिलेले आमदार म्हणजे पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे. हे बनसोडे अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर थेट विधानभवनात शपथ घेताना दिसले होते.

ही बातमी पण वाचा : ‘तुमची कामगिरी एकदम बेकार !’ अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांवर भडकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button