वडिलकीचा सल्ला घेण्यासाठी प्रशांत किशोर पवारांच्या भेटीला, अजितदादांचे स्पष्टीकरण

Ajit Pawar-Prashant Kishor-Sharad Pawar

पुणे : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) संपन्न झालेल्या विधानभेच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) पुन्हा सत्ता स्थापनेची संधी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत. या भेटीत शरद पवार (Sharad Pawar) आणि प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यात काय चर्चा होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भेटीमागचं स्पष्टीकरण दिले आहे. प्रशांत किशोर आणि शरद पवार यांची भेट राजकीय नाही, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे.

अजित पवार यांनी आषाढी वारीबद्दल माहिती देताना पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. प्रशांत किशोर आणि पवारांची भेट राजकीय नाही. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. देशाचे नेते आहेत. त्यांना भेटण्यासाठी, त्यांचा वडिलकीच्या नात्याने सल्ला घेण्यासाठी अनेक नेते भेटत असतात. त्यानुसारच प्रशांत किशोर त्यांची भेट घेण्यासाठी आले असल्याचे पवार यांनी सांगितले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपचे स्वप्न धुळीस मिळवणारे प्रशांत किशोर हे आता राष्ट्रवादीची पुढील रणनीती ठरवणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button