समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचे ऐकावे लागते : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय (Pandit deendayal upadhyay) यांच्या जयंतीनिमित्त केलेले ट्वीट डिलीट (Tweet Delete ) केल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु आहे. आता ट्विट डिलीट कारण्यासंदर्भात पवारांनी प्रतिक्रिया दिली .

समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागते , असे अजित पवार (Ajit pawar) म्हणाले. अजित पवार यांनी आज सकाळी

भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र तासाभरातच अजित पवारांनी हे ट्वीट डिलीट केलं. त्यामुळे अजित पवारांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट का केलं? याबाबत तर्क -वितर्क लावल्या जात होते .

यावर बोलताना अजित पवार म्हणाले की , अजित पवार म्हणाले की, “ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांच्याबाबत आपण चांगलं बोलतो ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्वीट केलं होतं. परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागते , इतर गोष्टीही असतात, असे ते म्हणाले .

ही बातमी पण वाचा : अजित पवारांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, शेतकी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER