अजित पवारांकडून अमित शहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, अनेकांच्या भुवया उंचावल्या

Ajit Pawar-Amit Shah

मुंबई : भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांचा काल वाढदिवस होता. काल सकाळपासूनच देशातील सर्वच नेत्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अजित पवारांनी ट्विटरवरून शाहा यांचे अभिष्टचिंतन केले आहे. अजित पवार यांनी अमित शाहांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीत प्रकृतीच्या कारणामुळे अनुपस्थित होते. मात्र, ही बैठक संपल्यानंतर काही वेळातच अजित पवार यांनी अमित शाहांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या महिन्यातही अजित पवारांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्तानं ट्विटरवरून अभिवादन केले होते. मात्र काही मिनिटांतच हे ट्विट त्यांनी डीलीट केले होते. आता त्यांनी अमित शाहांना शुभेच्छा दिल्यामुळे पुन्हा राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER