विधानसभा अध्यक्षपदाबाबत अजित पवारांचे मोठे विधान

Ajit Pawar

पुणे : काँग्रेसचे (Congress) नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या अध्यक्षपदाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देऊन शिवसेनेकडे विधानसभा अध्यक्षपद दिले जाईल, अशी चर्चा सुरू आहे.

यावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षपदाबाबत आधीच निर्णय झाला आहे. ते पद काँग्रेसकडेच राहणार. त्याबाबत काही बदल करायचा असेल, तर तीन नेते- शरद पवार- सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे निर्णय घेतील.” या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदाबाबत मोठे विधान केले आहे.

अजित पवार यांनी पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरही भाष्य केले. मुंबईमध्ये काय झाले ते तुम्ही पाहिले. त्या तक्रारकर्त्या महिलेनेच तक्रार मागे घेतली आहे. तरीही आरोप सुरू आहे. तिच्यामागे कोणी बोलविता धनी होता का, हेही तपासले पाहिजे. सध्या वीज बिलांचीदेखील समस्या सुरू आहे. वीज बिलासंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांकडे मोठी थकबाकी आहे, असेही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER