अजितदादांच्या सल्ल्यानंतर ‘त्या’ भाजप नेत्याच्या अडचणी वाढणार

Ajit Pawar - NCP

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) सल्ल्यानंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar) पंढरपूर (Pandharpur) दौऱ्यात कारखान्याच्या प्रश्नासाठी मागे-पुढे फिरणारे भाजप (BJP) नेते कल्याण काळेंच्या (Kalyan Kale) अडचणी वाढल्या आहेत. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील विशाल चव्हाण या शेतकऱ्यानं उपमुख्यमंत्री अजितदादांना फोन केला होता.

या संभाषणाची ‘ऑडिओ क्लिप’ आता व्हायरल झाली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशाल चव्हाण या शेतकऱ्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे याबाबत तक्रार केली. यावर अजितदादांनी थेट कल्याण काळे यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. यावर चव्हाण यांनी शेतकऱ्यांची कोण दखल घेत नाही, अशी खंत व्यक्त केली. यावर ‘पोलिसांना माझं नाव सांगा’ असे अजित दादा म्हणाले.

भाजप नेते कल्याण काळे यांचे पंढरपूर तालुक्यात सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना आणि सीताराम महाराज खर्डी येथे खासगी असे दोन साखर कारखाने आहेत. सन २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षांची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. तर २०१९-२० या गाळप हंगामात दोन्ही कारखाने बंद होते. दोन वर्षे एफआरपीची रक्कम थकीत आहे तर चालू हंगामात कारखाने सुरू  होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER