अजित पवार तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करून लपून बसता ; निलेश राणेंची टीका

Nilesh Rane - Ajit Pawar

मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली . उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काल अनेक प्रश्नांना उत्तर देताना विरोधकांना खडेबोल सुनावले . मात्र आता यावरुनच भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे .

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की , तीन पक्षांचे सरकार आले आणि हाता तोंडचा घास गेल्याने दु:ख झाले , असे आज अजित पवार बोलले. अजित पवार साहेब तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये रडता, मोबाईल बंद करुन लपून बसता. बिन खात्याचे तीन महिने मंत्री राहण्याचा मानही तुमचाच. तुम्ही इतके दु:खात होतात की राजकारण सोडून शेती करणार होतात. त्याचं काय झाले ? असे ट्विट निलेश राणेंनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER