काँग्रेसने पाठिंबा काढताच अजितदादा आमच्यासोबत येतील ; रामदास आठवलेंना विश्वास

ajit-pawar-will-reunite-with-bjp- Ramdas Athawale.jpg

मुंबई :- काँग्रेसने (Congress) पाठिंबा काढला की राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार (Ajit Pawar) ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केला .

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार पुन्हा एकदा साथ देतील आणि सरकार येईल, अशी आशा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आहे, म्हणूनच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणतात, असेही आठवले म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आदरच आहे. कारण त्यांच्यामुळे मी राजकारणात आलो. महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस एका बाजूला आणि राष्ट्रवादी- शिवसेना दुसऱ्या बाजूला आहेत. या भांडणात काँग्रेस कधी पाठिंबा काढून घेईल, सोनिया गांधी कधी सूचना देतील, सांगता येत नाही. आणि काँग्रेसने पाठिंबा काढला रे काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, असे वक्तव्य आठवले यांनी केले आहे .

अजित पवार पुन्हा एकदा साथ देतील आणि सरकार येईल, अशी आशा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आहे, म्हणूनच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणतात , असेही आठवले म्हणाले.

ही बातमी पण वाचा : ‘नशिबाने पद मिळालेले धरणवीर जास्तच बोलू लागलेत’, निलेश राणेंची अजित पवारांवर टोलेबाजी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER