शरद पवार दौऱ्यावर तर पुतणे अजितदादा पोहोचणार पंढरपुरात!

शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेणार

Ajit Pawar - Pandharpur

मुंबई : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विठुरायाच्या पंढरपूरनगरीमध्ये पाण्याचा हाहाकार पाहण्यास मिळाला आहे. पंढरपुरातील (Pandharpur) शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दौऱ्यावर निघाले आहे.

एकीकडे ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे वयाच्या 80 व्या वर्षी उस्मानाबादेत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करणार आहे. त्यांच्यापाठोपाठ आता पुतणे अजित पवारही दौऱ्यावर निघाले आहे. अजित पवार हे इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त ठिकाणांची पाहणी करणार आहे. त्यानंतर पंढरपूरमध्ये जावून परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

मागील 3 दिवसांपूर्वी झालेली अतिवृष्टी, धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी, यामुळे भीमा नदीची पातळी वाढून नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली. अनेक गावांमध्ये पाणी शिरले होते. भीमेच्या रूद्रावताराने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंढरपूर शहरात ही अनेक घरं, दुकान पाण्यात होती. त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER