अजितदादांवर नॉट रिचेबल होण्याची वेळ आली; निलेश राणेंकडून राजकीय भूकंपाचे संकेत?

AJit Pawar & NilEsh Rane

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, आता सरकारमधील मंत्र्यांच्या खात्यांची अदलाबदल होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यामध्ये सध्या राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे असलेल्या उपमुख्यमंत्रीपदाशिवाय आणखी एका पदाची निर्मिती करण्याचा विचार सुरु आहे. हे उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी शिवसेना (Shivsena) आणि काँग्रेसने आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी ‘अजित पवारांवर नॉट रिचेबल होण्याची वेळ आली’, असे सूचक वक्तव्य केले आहे. अजित पवारांना कधी मुख्यमंत्री होता आले नाही व ते कधी होणार नाहीत. पण कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं. पण आता दोन उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणार अशी चर्चा आहे. याचा अर्थ अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली. काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालंच पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे, असे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER