‘ये दादा का स्टाईल है!’ भल्या सकाळी बारामतीत नुकसानीची पाहणी करण्यासाठी अजित पवार मैदानात

Ajit Pawar

बारामती : उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी बारामतीत (Ajit Pawar visits Baramati) जाऊन, पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी अजित पवारांनी नद्यांसह ओढ्याभोवतीची अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. अजित पवार म्हणाले, ‘नदी-ओढ्याभोवतीची अतिक्रमणं तातडीने हटवा. माझं- अजित पवारांचे अतिक्रमण असेल तरी मुलाहिजा बाळगू नका. ’ असे ते म्हणाले .

वर्षानुवर्षे नदीपात्रासह ओढे अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळं अतिवृष्टी किंवा पुराच्या काळात मोठं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर नद्यांसह ओढ्याभोवतालची अतिक्रमणे त्वरित काढावीत असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. त्याच वेळी अतिक्रमणे काढताना कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका, भले ते अतिक्रमण अजित पवारांचे असले तरी काढून टाका, असं सांगत अजितदादांनी अधिकाऱ्यांना तत्पर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

(Ajit Pawar visits Baramati Dada style) नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीदरम्यान अजित पवार यांनी ठिकठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधत अधिकारी वर्गालाही सूचना दिल्या. पूरस्थिती टाळण्यासाठी नद्यांचे खोलीकरण करण्यासह नदी आणि ओढ्यांच्या परिसरातील अतिक्रमणे काढण्याची सूचना त्यांनी केली. नदी अथवा ओढ्यावर अजित पवारांचे अतिक्रमण असले तरी ते काढून टाका, कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका, असा स्पष्ट आदेश त्यांनी दिला.

दरम्यान परतीच्या पावसामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर राज्य सरकारकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. वेळ पडल्यास सरकार कर्ज काढून शेतकऱ्यांना मदत करेल, असे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. त्यामुळे आता शरद पवार यांच्या मराठवाडा दौऱ्यानंतर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही ठोस पावले उचलणार का, हे पाहावे लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER