अजित पवारांकडून दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट, चर्चेला उधाण

Ajit Pawar - Deendayal Upadhyaya

मुंबई : भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती. यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सुरुवातीला पंडित दीनदयाळ उपाध्याय (Deendayal Upadhyaya) यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारं ट्वीट केलं होतं. मात्र काही एका तासात अजित पवारांकडून हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. त्यामुळे अजित पवारांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट का केलं? अशा चर्चा रंगल्या आहेत.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन करणार ट्विट केलं आहे. यांनी आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांना जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. एकीकडे भाजपशी फारकत घेत काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीशी (NCP) हातमिळवणी करणारे उद्धव ठाकरे यांनी उपाध्याय यांना अभिवादन केले. तर दुसरीकडे अजित पवारांनी दीनदयाळ यांना अभिवादन करणारं ट्वीट डिलीट केल्याने राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER