… म्हणून ‘अजितदादां’नी बारामतीतील १४ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ आणला ७ दिवसांवर

Ajit Pawar

बारामतीत : राज्यात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर सरकारकडून काम सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. पण, बारामतीकरांनी या जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला आहे. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील १४ दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ (Janta Curfew) आणला ७ दिवसांवर आणला असल्याची माहिती समोर येत आहे .

जवळपास ४०० रुग्ण शहर तालुक्यात आढळले आहेत. या पार्श्वभुमीवर नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी १४ दिवसांचा जनता कर्फ्यू जाहिर करण्यात आला आहे.मात्र, हा निर्णय घेताना विश्वासात घेतले नसल्याचे सांगत व्यापाऱ्यांनी विरोध केला.त्यानंतर १४ दिवसांचा जनता कर्फ्यु ७ दिवसांवर आणण्यात आला आहे. यामध्ये रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर कर्फ्यु कमी करण्यात येईल. मात्र, रुग्णसंख्या वाढल्यास १४ दिवसांचा कर्फ्यु पुढे सुरुच राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली .

दरम्यान लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक कंबरडे आधीच मोडले आहे. त्यातच १४ दिवसांचा लॉकडाऊनमुळे हा निर्णय न परवडणारा होता.याबाबत व्यापारी महासंघाला विश्वासात घेतले नसल्याने त्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आली.त्यानंतर उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,नगराध्यक्षा,पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मांडल्या.त्यानंतर निर्णय बदलण्यात आल्याचे गुजराथी यांनी सांगितले.शहरातील निर्णय घेताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्याची अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER