ए मास्क लाव रे; जेव्हा अजितदादांचा सरकारी कर्मचाऱ्याला फटकारले

Ajit Pawar

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे नियम आणि मास्कचा आवर्जून वापर करणाऱ्या नेत्यांमध्ये अजित पवार (Ajit Pawar) आघाडीवर असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. आजही पुण्यात शेतीच्या फिरत्या प्रयोगशाळेची माहिती देताना मास्क न घालणाऱ्या कर्मचाऱ्याला अजितदादांनी दम भरला.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज फिरते माती, पाणी, पानदेठ परीक्षण प्रयोगशाळा चारचाकी वाहनाचे उदघाटन विधान भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी उपस्थित अधिकारी वर्गाकडून कशा प्रकारे परीक्षण केले जाणार आहे, याची अजित पवार माहिती घेत होते.

ही प्रयोगशाळा कशाप्रकारे काम करणार, असे अजितदादांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारले. तेव्हा आपण एका कर्मचाऱ्यास इस्त्रायलमध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावर अजित पवार यांनी संबंधित कर्मचाऱ्याला बोलावण्याची सूचना केली.

या कर्मचाऱ्याने समोर येत सर्वांना माहिती देण्यास सुरुवात केली. परंतु, यावेळी त्याने तोंडावरचा मास्क खाली केला होता. तेव्हा अजित पवार यांनी मास्क वर घेऊन तोंडाला लावून बोल, अशी सूचना त्या कर्मचाऱ्याला केली. अजितदादांनी ‘ए मास्क वर घे आणि बोल’, असा दम देताच संबंधित कर्मचाऱ्याने मास्क वर घेऊन माहिती देण्यास सुरुवात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER