राजकारणाच्या भानगडीत पडू नका; मी आलो आणि अडकलो : अजित पवार

Ajit Pawar

पुणे : “राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलो आणि अडकलोय, कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना.” असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकच हशा पिकवला. पुणे जिल्हा परिषदेत राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी अजितदादांनी विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. राजकारणाच्या भानगडीत पडू नका, मी राजकारणात आलोय आणि अडकलोय. कुठं जाता येईना आणि बाहेरही पडता येईना, असं अजितदादा हसत म्हणाले.

कोणत्याही क्षेत्रात जा, पण आईवडिलांचे नाव रोशन करा, असा सल्ला उपमुख्यमंत्र्यांनी दिला. चारित्र्याला डाग लागणार नाही, याचा विचार करा, विश्वासार्हता संपली की माणूस संपतो. मित्र निवडताना चांगले मित्र निवडा, मित्रच बरबाद करायला असतात, अशा कोपरखळ्याही अजितदादांनी मारल्या. कोरोनाच्या महामारीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे नवे माध्यम स्वीकारले पाहिजे. ऑनलाईन शिक्षण (Online Education) सुरू आहे; पण कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे काळजी घेतली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER