पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही- अजित पवार

Ajit Pawar

मुंबई :- कायदा आणि सुव्यवस्थेला किंवा पोलीस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचं काम कुणी करत असेल, जनतेच्या मनातून पोलीस दलाला उतरवण्याचं काम कुणी करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

विरोधक सातत्याने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करत आहे. पण मला त्यांना सांगायचे की महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) पूर्ण बहुमत आहे. आमच्या मित्रपक्षाचे आमदार आमच्यासोबत आहे. साहजिकच महाविकास आघाडी पूर्णबहुमताने सत्तेत आहे, असे म्हणत अजित पवारांनी विरोधकांना फटकारले आहे.

जी वस्तुस्थिती आहे, जे खरं सत्य आहे ते महाराष्ट्रातील जनतेसमोर 100 टक्के येईल. काळजी करण्याचं कारण नाही. गेले काही दिवस राज्यात जे काही वातावरण तयार करण्यात आले. त्यामध्ये कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. चौकशा सुरू आहेत, असे अजित पवारांनी म्हटले .

दरम्यान रश्मी शुक्लांचे पत्र काय आहे? सुबोध जैस्वाल यांचे पत्र काय आहे? यादी दिली त्याबाबत बोलण्यात आले आहे. मी आज प्रशासनात काम करत नाही. गेली 30 वर्षे प्रशासन सांभाळत आहे. असे सांगतानाच ज्यांच्याकडे कुठलंही महत्त्वाचे पद नाही अशा पध्दतीने कुणाबद्दलही येत आहे. त्यांचीही चौकशी करु, असे अजित पवारांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : पुण्यात लॉकडाउन?  अजित पवारांचे  काळजी घेण्याचे  आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER